spot_img
spot_img
spot_img

सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन व सेवा संकल्प अभियानाच्या औचित्याने समाज कल्याण विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यासाठी समाज कल्याण कार्यालय तत्पर राहील. ज्येष्ठ नागरिकांमधील उत्साह आनंद सामाजिक कार्याची ओढ आदी बाबी वाखाणण्यासारख्या आहेत. ज्येष्ठ नागरिक व तरुण पुढील यातील विसंवाद दूर करून एकमेकांना समजून घेऊन आपापसातील चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात असे आवाहन सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले.

यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या पाटस, बारामती,शिरूर,पुरंदर, जुन्नर, लोणावळा,भोर वडगाव शेरी येथील बिगर सहकारी संस्था, ज्येष्ठ नागरिक नागरिक संघ,निवारा वृद्धाश्रम मातोश्री वृद्धाश्रम, महिला वृद्धाश्रम येथील ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करण्यात आला.

दोन पिढ्यांमध्ये सुसंवाद, विचारांचे आदान-प्रदान करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक व युवा पिढी यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला समाजकल्याण विभागातील अधिकारी कर्मचारी व सुमारे ३०० ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!