spot_img
spot_img
spot_img

आरोग्य नवोन्मेष व गुणवत्ता सुधारणेसाठी राज्यस्तरीय ‘लिव्हिंग लॅब’ विकसित, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या ‘सर्वांसाठी आरोग्य’ या ध्येयाला पूरक ठरणारी आरोग्य नवोन्मेष आणि गुणवत्ता सुधारणेसाठीची राज्यस्तरीय ‘लिव्हिंग लॅब’ विकसित होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या माध्यमातून आरोग्य सुविधांचा दर्जा आणि गुणवत्ता मानकांचे पालन सुधारण्यासह राज्यातील नागरिकांसाठी कौशल्य विकास व रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर सुद्धा भर देण्यात येणार आहे.

स्थानिक आरोग्यविषयक प्राधान्यक्रम निश्चित करणे, समुदायांसोबत उद्देशानुरूप उपाय तयार करणे आणि प्रत्यक्ष आरोग्य व्यवस्थेत नव्या पद्धतींची चाचणी घेणे, हा या व्यासपीठाचा उद्देश आहे. शासन, आरोग्यसेवा प्रदाते, खासगी क्षेत्र, शैक्षणिक संस्था, नवोन्मेषक आणि विकास भागीदारांचे अनुभव व क्षमता एका सामायिक व्यासपीठावर आणून सध्याची आरोग्य व्यवस्था आणि उपचार मार्ग अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न ‘लिव्हिंग लॅब’च्या माध्यमातून करण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा प्रयत्न आहे.  कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल आरोग्य, डेटा आणि ‘प्रिसिजन हेल्थ’सह नवोन्मेष व तंत्रज्ञानाच्या क्षमतांचाही यासाठी उपयोग केला जाणार आहे.

खासगी आरोग्य क्षेत्राची व्याप्ती व क्षमता सार्वजनिक आरोग्याच्या प्राधान्यक्रमांशी जोडणे, ही या उपक्रमातील महत्त्वाची संधी आहे. विविध भागधारकांच्या सहभागातून स्थानिक गरजांना प्रतिसाद देणारे व्यवहार्य, परवडणारे आणि सुलभ उपाय विकसित करता येतील. यशस्वी उपायांचा महाराष्ट्रासह अन्य ठिकाणीही विस्तार करण्याची क्षमता तपासली जाईल. उपक्रमाच्या पुढील टप्प्यांत समुदायाच्या आरोग्यविषयक गरजांशी निगडित स्थानिक कौशल्यविकास, रोजगार आणि उद्योगनिर्मितीच्या संधींचाही शोध घेतला जाणार आहे.

केवळ नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याऐवजी दुर्गम व आरोग्यसेवेपासून वंचित घटकांसह प्रत्येक नागरिकापर्यंत नवोन्मेष पोहोचविण्यावर या संकल्पनेत भर आहे. शासन, समुदाय, नवोन्मेषक आणि भागीदारांच्या सहभागातून परिणामकारक उपायांची चाचणी, त्यातून मिळणाऱ्या अनुभवांचे वेगाने विश्लेषण आणि आरोग्यसेवेची गुणवत्ता व समानता सुधारणाऱ्या उपायांचा व्यापक विस्तार करण्याचे उद्दिष्ट आहे.

पुरावेनिर्मिती आणि सहकार्याचे व्यासपीठ म्हणून ‘लिव्हिंग लॅब’ विकसित केली जाणार आहे. समुदायाच्या गरजा आणि स्थानिक मालकी या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी ठेवून नवोन्मेष, आरोग्य व्यवस्था आणि प्रत्यक्ष सेवा देणाऱ्या घटकांमधील समन्वय अधिक मजबूत केला जाईल.

‘द फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया’चा ‘मान्यता’ हा प्रमुख उपक्रम या दृष्टिकोनाचे प्रारंभिक उदाहरण आहे. मातृ आरोग्यसेवा बळकट करण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना पूरक असलेल्या या उपक्रमातून खासगी क्षेत्रातील गुणवत्ता सुधारणा प्रारूप सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसोबत कशा प्रकारे कार्य करू शकते, हे दिसून येते.

‘एमएसडी फॉर मदर्स’ या उपक्रमाचा समन्वय  करीत असून, या सहयोगी प्रारूपाच्या विकासासाठी विविध भागीदारांचा समूह एकत्र आणत आहे. नवोन्मेषाचे व्यवहार्य व शाश्वत उपायांमध्ये रूपांतर करून व्यवस्था बळकट करण्यासाठी भागीदारीचा उपयोग केला जाणार आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!