spot_img
spot_img
spot_img

तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडून गांजा जप्त; एकाला अटक

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 बेकायदेशीररीत्या गांजा बाळगून त्याचे सेवन केल्याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

याप्रकरणी भीमराव बाबा खिलारे (वय २९, पोलिस कॉन्स्टेबल, नेमणूक तळेगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपी सलीम हुसेन मुजावर (वय ६३, रा. मावळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ५.१० वाजता महालक्ष्मी मंदिराच्या मागील बाजूस, इंदोरी येथे आरोपीकडे गांजा आढळून आला. त्याच्याकडील गांजा बेकायदेशीररीत्या जवळ बाळगून चिलीममध्ये भरून सेवन करत असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले.
या प्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!