spot_img
spot_img
spot_img

पिंपरीतील लॉजमध्ये जुगार; १० जणांवर गुन्हा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 पिंपरीतील एका लॉजच्या खोलीत तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या दहा जणांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ४ लाख २२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी जावेद शहाबुद्दीन मुजावर, पोलिस हवालदार यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपींमध्ये दानिश मेहबूब चौधरी (वय ३१), वरनदीप मनजित सोढी (वय ३३), नईममुल्ला अजमतमुल्ला चौधरी (वय ३२), गुड्डू गिरीजाशंकर विश्वकर्मा (वय ३५), रिजवान अकबर चौधरी (वय ३१), रवी रामकिरण भरई (वय ३५), मुजाहिर इब्राहिम औटी (वय ३२), विनोद पप्पू डपोलिया (वय ३४), नौशाद इसाक शेख (वय ३६) आणि हरिश काडिया पुजारी (वय ५८) यांचा समावेश आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ४ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ९ वाजता हॉटेल प्रेस्टीज लॉजच्या रूम क्रमांक १०५ मध्ये आरोपी तीन पत्ती जुगार खेळत होते. पोलिसांनी छापा टाकून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले.
या प्रकरणी महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!