spot_img
spot_img
spot_img

रहाटणीत प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग; लोखंडी सुरा घेऊन फिरणाऱ्यावर कारवाई

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत शस्त्र बाळगण्यासंदर्भात प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना लोखंडी सुरा बाळगल्याप्रकरणी काळेवाडी पोलिसांनी एका व्यक्तीवर कारवाई केली.

याप्रकरणी भीमाशंकर अंबाजी भोसले, पोलिस शिपाई पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी सयाजी दत्ता सालंकमवाड (वय ४०, रा. गणेश नखाते यांच्या भाड्याच्या खोलीत, मथुरा कॉलनी, राहटणी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे १२.०५ वाजता राजगड कॉलनीसमोर, नखाते चौकाजवळ, राहटणी येथे आरोपीकडे लोखंडी सुरा आढळून आला.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत दंगा अथवा शस्त्रांचा वापर करून शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बाळगण्यास अथवा जवळ ठेवण्यास मनाई असतानाही आरोपीने आदेशाचा भंग करून लोखंडी सुरा बाळगल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!