spot_img
spot_img
spot_img

म्हाळुंगे-बालेवाडीत भारत कराटे अकॅडमीच्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत १०३२ खेळाडूंचा सहभाग

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे भारत कराटे अकॅडमीच्या वतीने ६ सप्टेंबर रोजी भव्य राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून १,०३२ खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेच्या उ‌द्घाटनप्रसंगी कराटे-दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष सलाउ‌द्दीन अन्सारी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, लिडकॉमचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, नईम बागबान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेदरम्यान मुळशी तालुक्याचे आमदार शंकर मांडेकर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे क्रीडा सभापती कैलास कुटे, मुळशी तालुका सभापती मंदाताई शेळके, मुळशी तालुका माजी सभापती सागर साखरे, पिं. चिं. कराटे संघटनेचे अध्यक्ष योगेश मोरे, नगरसेविका पल्लवी जगताप, अनिल अबनावे, संदीप काटे, प्रदीप बोरसे, रवी भिलारे, महेश डोंगरे, श्रीमती. आभा सिंग, फौजीया जमादार, प्रिती भागवत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील पंचांच्या देखरेखीखाली स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी विविध कराटे प्रकारांमध्ये उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन केले.

यावेळी भारत कराटे अकॅडमीच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला. नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देतानाच त्यांना उच्चस्तरीय स्पर्धाचा अनुभव मिळावा, या उ‌द्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. भारत कराटे अकॅडमी महाराष्ट्रातील अग्रगण्य कराटे प्रशिक्षण संस्था असून, खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घडविण्यासाठी अकॅडमीच्या माध्यमातून सातत्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत.

या भव्य स्पर्धेचे यशस्वी आयोजन भारत कराटे अकॅडमीचे अध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पंच, प्रशि आयोजकांनी आभार मानले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!