spot_img
spot_img
spot_img

विसर्जन घाटांवर महापालिकेकडून स्वच्छतेची तत्पर यंत्रणा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील विसर्जन घाट तसेच मिरवणूक मार्गांवर स्वच्छता, कचरा संकलन आणि निर्माल्य विलगीकरणाची विशेष यंत्रणा राबविण्यात आली. २२ ते २५ सप्टेंबर या चार दिवसांत तब्बल ६५०० मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला. यासाठी सुमारे तीन हजारांहून अधिक सफाई सेवक प्रत्यक्ष मैदानात कार्यरत होते.

विसर्जन घाट आणि मिरवणूक मार्गांवर निर्माण होणारा कचरा तातडीने हटविण्यासाठी आरोग्य विभागाच्या स्वच्छता पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. विसर्जनाच्या दिवशी मोठी गर्दी असतानाही स्वच्छता पथकांनी सातत्याने काम करून घाट परिसर आणि मिरवणूक मार्ग स्वच्छ ठेवले.

दरम्यान, गणेशमूर्तींना वाहण्यात आलेली फुले, हार तसेच पूजासाहित्यापासून निर्माण झालेले २९४.६५५ मेट्रिक टन निर्माल्य स्वतंत्रपणे संकलित करण्यात आले. निर्माल्य कचऱ्यात मिसळू नये, यासाठी विसर्जन घाटांवर स्वतंत्र निर्माल्य संकलन आणि विलगीकरणाची व्यवस्था आरोग्य विभागाकडून करण्यात आली होती.

विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही स्वच्छता सेवकांनी तत्परतेने काम सुरू ठेवत घाट परिसर तसेच मिरवणूक मार्गांची स्वच्छता केली. त्यामुळे विसर्जनानंतरची स्वच्छता व्यवस्था सुरळीत आणि प्रभावीपणे राबविण्यात आली.

उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले, “गणेशोत्सव आणि विसर्जन काळात शहरातील स्वच्छता व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आरोग्य विभागाची पथके सातत्याने कार्यरत होती. घाट परिसरात नागरिकांना स्वच्छतेच्या सुविधा तत्परतेने मिळाव्यात, यासाठी स्वच्छता पथके प्रत्यक्ष ठिकाणी कार्यरत राहिली. यापुढे ही नागरिकांनीही आपला कचरा रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी न टाकता त्याचे योग्य विलगीकरण करून महापालिकेच्या संकलन व्यवस्थेकडे द्यावा. शहराची स्वच्छता राखणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.

गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी महापालिकेच्या स्वच्छता यंत्रणेला दिलेल्या सहकार्यामुळे विसर्जनानंतरची स्वच्छता व्यवस्था सुरळीतपणे राबविण्यास मदत झाली. शहराची स्वच्छता कायम राखण्यासाठी यापुढेही नागरिकांनी महापालिकेच्या स्वच्छता यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

गणेश विसर्जनाच्या कालावधीत नागरिकांनी स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेला दिलेले सहकार्य अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले. अनेक नागरिकांनी निर्माल्य स्वतंत्रपणे जमा करून कचरा योग्य ठिकाणी देण्यास प्राधान्य दिल्यामुळे घाट परिसर आणि मिरवणूक मार्गांवरील स्वच्छता व्यवस्था सुरळीत ठेवण्यास मदत झाली. स्वच्छतेबाबत नागरिकांनी दाखविलेली ही जागरूकता आणि सहकार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर, मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला कचरा तातडीने संकलित करून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सातत्याने कार्यरत राहिलेल्या सर्व सफाई सेवक व आरोग्य विभागाच्या पथकांचे काम कौतुकास पात्र असून, नागरिक आणि महापालिका यंत्रणेच्या समन्वयातून स्वच्छतेची ही व्यवस्था प्रभावीपणे राबविता आली.

-डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!