spot_img
spot_img
spot_img

आळंदीत कपड्याच्या दुकानाचे शटर उचकटून १७ हजार रुपयांचा ऐवज चोरीला

शबनम न्यूज | प्रतिनिधी

आळंदी परिसरातील कपड्याच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश करत अज्ञात चोरट्याने कपडे व रोख रक्कम असा एकूण १७ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरीला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बिट्टुकुमार बिरेंद्र महतो, (वय २१ वर्षे रा. आळंदी, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या ओम साई नावाच्या कपड्याच्या दुकानाचे शटर अज्ञात इसमाने उचकटले. त्यानंतर दुकानात प्रवेश करून दुकानातील कपडे आणि रोख रक्कम चोरी केली. चोरीला गेलेल्या मालामध्ये अंदाजे ९ हजार रुपये किमतीचे विविध रंगांचे ३० शर्ट, ७ हजार ५०० रुपये किमतीच्या विविध रंगांच्या १५ जीन्स पँट, तसेच १२०० रुपये रोख रक्कम होती. रोख रकमेमध्ये ५०० रुपयांच्या एका नोटेसह १०० रुपयांच्या सात नोटांचा समावेश असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. एकूण १७ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला असून याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!