शबनम न्यूज | प्रतिनिधी
भरधाव वेगाने आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून दुचाकी चालविताना पुढे असलेल्या वाहनाला धडक दिल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाल्याची घटना बावधन परिसरात घडली. या प्रकरणी सागर शंकर पावडे, पोलीस शिपाई, नेमणूक बावधन पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदित्यनाथ चौगुले, (वय १८ वर्षे, रा. कोंढवा, पुणे) हा रॉयल एनफिल्ड जीटी कॉन्टिनेंटल 650 या दुचाकीचा चालक होता. २५ सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर टाटा शोरूमच्या पुढे, चांदणी चौक, बावधन येथे आरोपी दुचाकी भरधाव वेगाने चालवत होता.
वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे वाहन चालविताना त्याने पुढे असलेल्या वाहनाला धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेले यशराज विजय मोरे जखमी झाले. त्यांना गंभीर दुखापत झाली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 281, 106(1), 125(ब), 324(4) तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार आणि भादंवि कलम 279 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




Total Users : 226686