शबनम न्यूज | प्रतिनिधी
दूध विक्री करत असल्याचा व्हिडिओ काढल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर चौघांनी हल्ला केल्याची घटना पिंपरी परिसरात घडली. हल्ल्यात फिर्यादीच्या नाकाला गंभीर दुखापत होऊन हाड फ्रॅक्चर झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी मोहन प्रकाश सबनानी, (वय ४३ वर्षे रा. पिंपरी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात जितू मयारामानी, हितेश मयारामानी, रोहन आणि परवेज, तसेच अन्य चार अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी घरी जात असताना त्याला गर्दी दिसल्याने तो थांबला. त्यावेळी काही जण अमूल दूध ब्रँडच्या नावाने ६० रुपयांचे दूध ३० रुपयांना विकत असल्याचे फिर्यादीच्या निदर्शनास आले. याबाबत कंपनीला व्हिडिओ पाठविण्यासाठी फिर्यादी मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत होता.
त्यावेळी आरोपी क्रमांक एक फिर्यादीजवळ आला आणि व्हिडिओ डिलीट करण्यास सांगत त्याच्या नाकावर बुक्की मारली. त्यानंतर आरोपी क्रमांक दोन व इतर आरोपींनीही फिर्यादीशी वाद घालून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या मारहाणीत फिर्यादीच्या नाकावर गंभीर दुखापत होऊन नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले.




Total Users : 226619