spot_img
spot_img
spot_img

‘शिवराज्य – एका नव्या युगाची सुरुवात’ ; प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुणे फेस्टिव्हलमध्ये ओम डान्स अकॅडमीच्या विद्यार्थाने ‘शिवराज्य – एका नव्या युगाची सुरुवात’ हा नृत्यनाट्य कलाप्रकार बुधवार दि. २३ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये १२ नृत्यरचना होत्या. संस्थेचे ९० विद्यार्थी कलावंत यामध्ये सहभागी झाले होते. याची संकल्पना आणि नृत्यदिग्दर्शन ओम डान्स अकॅडमीचे ओमकार शिंदे यांनी केली होती. सादरीकरण चेतन चावडा यांनी केले होते.

शिवरायांचा इतिहास, नृत्य, अभिनय, संवाद, संगीत आणि थरारक सादरीकरणातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. आजच्या काळात डी.जे. लावून, धिंगाणा घालत सादर होणारी शिवजयंतीवर भाष्य करणारे आणि बहिर्जी नाईक, जिजामाता आणि आजचा कार्यकर्ता यांच्या संभाषणातून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे शौर्य, धैर्य, युद्ध आणि नीती उलगडत जातात. शिवजन्मोत्सव ते शिवराज्याभिषेक सोहळा अशा १२ नृत्यांचे सादरीकरण यातून केले गेले. अंगावर शहारे आणणारे स्टंटस, अभिमान वाटावे असे क्षण, डोळ्यात अश्रू आणणारे प्रसंग, टाळ्या घेणारे आणि हसवणारे संवाद असा सर्व रंगांनी भरलेला कार्यक्रम होता.

याचे समन्वयक ओमकार शिंदे होते. या प्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, विश्वस्त मोहन टिल्लू यांनी कलावंतांचे सत्कार केले. संयोजन समिती सदस्य श्रीकांत कांबळे, अतुल गोंजारी, सचिन आडेकर यावेळी उपस्थिती होती.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!