शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे फेस्टिव्हलमध्ये ‘चौथी सिगरेट’ नाटकाने सर्जनशील यशाची काळी बाजू प्रेक्षकांसमोर उघड्या रूपात मांडली. यामध्ये घोस्ट रायटर्स आणि लेखक म्हणून मान्यता मिळवण्याची कृत्रिम बुद्धिमत्तेची महत्त्वाकांक्षा अशा जगाचा पर्दाफाश होतो. या सगळ्या प्रवासात शेवटी एका कृत्रिम बुद्धिमत्तेचे पुस्तक बेस्टसेलर ठरते आणि त्याला प्रतिष्ठेचा ‘बुकर प्राईज’ सुद्धा मिळतो.
‘सध्याच्या काळात जेव्हा शैक्षणिक, साहित्यिक आणि कला जगतामध्ये साहित्यिक चोरी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, अशा पार्श्वभूमीवर हे नाटक अतिशय समर्पक ठरते’, असे दिग्दर्शक अभिजित चौधरी यांनी सांगितले.
या नाटकाचे निर्माते ‘स्वतंत्र थिएटर’चे ‘युवराज शाह’ असून, सुयश कुकरेजा, राजीव भारद्वाज हे दोन मुख्य अभिनेते आहेत आणि कला दिग्दर्शन धनश्री हेबळीकर यांनी केले आहे. या नाटकास प्रेक्षांकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, विश्वस्त मोहन टिल्लू यांनी कलावंतांचे सत्कार केले. संयोजन समिती सदस्य श्रीकांत कांबळे, अतुल गोंजारी, सचिन आडेकर इत्यादी उपस्थित होते.




Total Users : 225550