spot_img
spot_img
spot_img

रस्त्याच्या भ्रष्टाचाराला रांगोळीचा वेडा!

कुदळवाडीत मारुती जाधव यांचा अनोख्या पद्धतीने निषेध; निकृष्ट रस्ते कामांची चौकशी करण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड : कुदळवाडी परिसरातील रस्त्यांच्या निकृष्ट कामांबाबत आणि रस्ते विकासाच्या नावाखाली होत असल्याचा आरोप असलेल्या कथित गैरप्रकारांविरोधात सामाजिक कार्यकर्ते मारुती गणपत जाधव यांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. रस्त्यावरच रांगोळी काढून त्यामधून रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

कुदळवाडी परिसरातील नागरिकांना खराब रस्ते, मोठमोठे खड्डे, धुळीचे साम्राज्य आणि अपुऱ्या रस्ते सुविधांचा सामना करावा लागत असल्याचा आरोप जाधव यांनी केला. रस्ते विकासासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जात असतानाही काही काळातच रस्त्यांची अवस्था पुन्हा खराब होत असेल, तर या कामांच्या गुणवत्तेची तसेच निधीच्या वापराची सखोल तपासणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.

“रस्ते विकासासाठी निधी येतो, कामे होतात; मात्र काही दिवसांतच रस्त्यांची अवस्था पुन्हा खराब होते. त्यामुळे कामांची गुणवत्ता, ठेकेदारांची जबाबदारी आणि खर्च झालेल्या निधीचा हिशोब नागरिकांसमोर पारदर्शकपणे मांडण्यात यावा,” अशी मागणी मारुती जाधव यांनी केली.

रस्त्यावर रांगोळी काढून केलेल्या या अनोख्या निषेधामुळे परिसरातील नागरिकांचेही लक्ष वेधले गेले. केवळ कागदोपत्री कामे न करता प्रत्यक्ष रस्त्यांची पाहणी करून परिस्थितीची वस्तुस्थिती तपासावी, अशी मागणी करण्यात आली.

कुदळवाडीतील रस्त्यांच्या कामांची तातडीने पाहणी करून कामाच्या गुणवत्तेची चौकशी करावी, निधीचा वापर तपासावा आणि दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती गणपत जाधव यांनी केली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!