spot_img
spot_img
spot_img

वडगाव शेरीत दावनपेल्ली कुटुंबीयांच्या घरी श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठापना

तिरुपती बालाजी मंदिराचा सुरेख देखावा; मोदक, लाडू व फळांचा सात्विक नैवेद्य

पुणे : वडगाव शेरी येथील राजेश दावनपेल्ली यांच्या निवासस्थानी श्री गणरायाची भक्तिमय वातावरणात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी घरामध्ये तिरुपती बालाजी मंदिराचा सुरेख देखावा साकारण्यात आला होता. या देखाव्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

श्री गणरायाला मोदक, लाडू आणि विविध फळांचा सात्विक नैवेद्य दाखवून विधिवत आरती करण्यात आली. यावेळी दावनपेल्ली कुटुंबीयांनी भक्तिभावाने गणरायाची पूजा-अर्चा केली.

या आरती सोहळ्यास राजेश दावनपेल्ली, मावशी गायत्री दुडका, लक्ष्मी रमेश दावनपेल्ली, रमेश नारायण दावनपेल्ली, प्रशांत रमेश दावनपेल्ली आदी उपस्थित होते. गणरायाच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!