spot_img
spot_img
spot_img

उन्नती सोशल फाउंडेशनचा ‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६व्या वाढदिवसानिमित्त उन्नती सोशल फाउंडेशनचा ‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रम ७६ दिव्यांनी औक्षण; ७६ सफाई कामगारांना छत्र्यांचे वाटप; महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’

पिंपळे सौदागर| प्रतिनिधी  

पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या ७६व्या वाढदिवसानिमित्त उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने ‘आशीर्वादाचा दिवा’ या संकल्पनेअंतर्गत विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी ७६ दिव्यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या प्रतिमेचे औक्षण करण्यात आले. तसेच समाजाच्या स्वच्छतेसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या ७६ सफाई कामगारांना उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. समाजातील विविध घटकांपर्यंत सेवा पोहोचविणे, स्वच्छता, सामाजिक बांधिलकी आणि विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देणारे उपक्रम राबविण्यावर या अभियानात भर देण्यात येणार आहे.

यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करताना सफाई कामगार माता-भगिनी व बांधवांच्या हस्ते आरती करण्याचा मान देण्यात आला. देशसेवेसाठी समर्पित नेतृत्वाला उदंड आयुष्य लाभावे आणि विकसित भारताचे स्वप्न साकार व्हावे, यासाठी या दिव्याच्या माध्यमातून प्रार्थना करण्यात आली आहे. सेवा हीच खरी समाजाप्रती बांधिलकी असून, संपूर्ण महिनाभर सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.”

या अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच , नागरिकांनी तयार केलेल्या उल्लेखनीय रील्स उन्नती सोशल फाउंडेशनच्या सोशल मीडिया माध्यमांवर प्रसिद्ध करण्यात येणार असून, निवडक उपक्रमांची माहिती पुढील स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.पिंपळे सौदागर परिसरातील लिनिअर गार्डन, राजमाता जिजाऊ उद्यान, कलाकार कट्टा, रस्ते तसेच परिसरातील विविध विकासकामांवर आधारित रील्स तयार करताना संबंधित नगरसेवकांचे नाव स्पष्टपणे नमूद करण्याचे आवाहन करण्यात आले. स्पर्धेसाठी इच्छुक नागरिकांनी उन्नती सोशल फाउंडेशनच्या कार्यालयाशी किंवा स्वयंसेवकांशी संपर्क साधावा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या ७६व्या वाढदिवसानिमित्त सेवा, सामाजिक सहभाग आणि विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले.

याप्रसंगी , उन्नती सोशल फाउंडेशन चे संस्थापक श्री संजय भिसे, भाजपा पिंपरी चिंचवड सोशल मीडिया अध्यक्ष सागर बिरारी रश्मी मोरे, उपाध्यक्ष, उन्नती सखी मंच यांच्यासह उन्नती सोशल फाउंडेशनचे सदस्य विठाई भाषण वरिष्ठ सदस्य ऑल सीनियर सिटीजन असोसिएशनच्या सदस्य आनंद हास्य क्लबचे सदस्य यांच्या सह पिंपळे सौदागर मधील नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!