spot_img
spot_img
spot_img

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ‘आविष्कार स्पर्धा’उत्साहात संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 रयत शिक्षण संस्थेच्या , डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ‘अविष्कार स्पर्धा’ अत्यंत उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या कल्पकतेच्या आणि संशोधक वृत्तीच्या बळावर अनेक आकर्षक पोस्टर्स व प्रकल्प सादर केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ शशिकांत कुरबेट्टी. मा. राजेंद्र शेलार, मा. प्रल्हाद साळुंखे, मा. सूर्यकांत सरोदे हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून डॉ. दिनकर मुरकुटे, डॉ. मारोती केकाणे आणि डॉ. प्रतिमा कदम हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. प्रभंजन चव्हाण यांनी भूषविले
मार्गदर्शन करताना औंध कॉलेज डेव्हलपमेंटचे डॉ. शशिकांत कुरबेट्टी यांनी सांगितले की, “आजचा जमाना जरी AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) चा असला, तरी एआय मुळे इंटरेक्शन अँडव्हान्स लेव्हलवर काम करते. विद्यार्थ्यांनी ‘ आविष्कार ‘ या कार्यक्रमाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. पदवी पूर्ण होण्याच्या अगोदर विद्यार्थ्यांनी या माध्यमातून अनेक आविष्कार घडवून आणले पाहिजेत.” विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी कुरबेट्टी सर नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात पुढे बोलताना मा. प्रल्हाद साळुंखे म्हणाले की, “सर्व पोस्टर्स पाहून मन भरून येते आणि खूप कौतुक वाटते. ही स्पर्धा नेमकी काय? तर नवीन गोष्टींचा शोध घेणारी ही स्पर्धा आहे. आपण संगणकाला जसा प्रश्न विचारू, तसे तो उत्तर देईल; पण मानवी बुद्धिमत्ता ही सर्वोत्कृष्ट असते. आपण AI ला काय विचारतो आणि कसे विचारतो याला महत्त्व आहे. आपल्या संशोधनाचा समाजाला काय फायदा होतो, याचा विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे.”
परीक्षक डॉ.मारोती केकाणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “तुम्ही या स्पर्धेत सहभाग घेऊन आविष्कारच्या पहिल्या टप्प्या पार केला आहे. याचा उपयोग तुमच्या आयुष्याच्या घडणीत नक्की होईल.”
मा. सूर्यकांत सरोदे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ” आविष्कार हा विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवणारा विषय आहे. आपण आत्मसात केलेल्या गोष्टींचा आविष्कार समाजासाठी उपयोगात आणला पाहिजे.”
मा. प्राचार्य डॉ. प्रभंजन चव्हाण यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वैशाली सुपेकर यांनी केले. आभार डॉ. रेश्मा दिवेकर यांनी मानले . तर सूत्रसंचालन डॉ. प्रांजली शहाणे, प्रा. अमृता मुखेकर यांनी केले. या स्पर्धेसाठी एकूण ४४ विद्यार्थ्यांनीभाग घेतला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!