spot_img
spot_img
spot_img

पुणे फेस्टिव्हलमधील सुलेखन प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्रातील ५० हून अधिक सुलेखनकारांच्या ३०० हून अधिक सुंदर अक्षरातील कलाकृतींचे प्रदर्शन पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बालगंधर्व कलादालनात गुरुवार दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० ते रात्री ८.०० या वेळेत संपन्न झाले. त्यास पुणेकर आणि शाळकरी विद्यार्थांनी फार मोठा प्रतिसाद दिला. अक्षरनंद कॅलीग्राफीच्या वतीने आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त वसुंधरा बारवे, संथेचे अध्यक्ष प्रमोद पाटील, प्रमोद उमरदंड, सचिन आडेकर अनेक चित्रकला शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी रमणबाग आणि मॉडर्न हायस्कूल या दोन शाळांमधील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना सुलेखनाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. ‘सुलेखन ही कला असून प्रत्येकाचेच अक्षर सुंदर आणि वळणदार असावे. त्यासाठी शाळकरी वयातच विद्यार्थ्यांना सुलेखनाचे प्रशिक्षण द्यावे असे कृष्णकुमार म्हणाले’.  

यामध्ये १२x१८ इंच आकारात मराठीतील रंगीत सुलेखन कलाकृती सादर झाल्या. तसेच अनेक प्रात्यक्षिके देखील सादर केली गेली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!