spot_img
spot_img
spot_img

वयाच्या सातव्या वर्षी ध्रुव करमचंदानीची राष्ट्रीय स्तरावर झेप

स्केटिंगमधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘सुवर्णलक्ष्य राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२६’ने सन्मान

शबनम न्यूज | प्रतिनिधी

अवघ्या सातव्या वर्षी राष्ट्रीय स्तरावर स्केटिंगमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ध्रुव रवी करमचंदानी याला ‘सुवर्णलक्ष्य राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. स्केटिंग क्रीडा क्षेत्रातील त्याच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला आहे. याबाबत ध्रुव याचे नगरसेवक डब्बू आसवानी यांनी सन्मान केले.

मेजर ध्यानचंद सेंट्रल स्पोर्ट्स कौन्सिल, इंडिया यांच्या वतीने ३० ऑगस्ट २०२६ रोजी मिरज, सांगली येथील बालगंधर्व नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात ध्रुवचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्याला पुरस्कारासोबत पदक देण्यात आले. तसेच त्याची ‘व्हीआयपी पर्सन ऑफ इंडिया’ म्हणूनही निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

ध्रुव हा राष्ट्रीय स्तरावरील स्केटिंगपटू असून, गेल्या दोन वर्षांपासून तो स्केटिंगमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत आहे. या कालावधीत त्याने जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये तब्बल २० पदके आणि ३ ट्रॉफी, तसेच १ राज्यस्तरीय पदक आणि १ राष्ट्रीय पदक पटकावले आहे.

ध्रुवच्या या यशाची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे त्याची मालदीव येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवत आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्याने त्याच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!