spot_img
spot_img
spot_img

ड्रायव्हर डे उत्साहात साजरा; सुरक्षित वाहनचालना आणि वाहतूक शिस्तीचा संदेश

शबनम न्यूज | प्रतिनिधी

वाहनचालकांच्या योगदानाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आज ड्रायव्हर डे उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात वेदांत मोटर ड्रायव्हिंग स्कूल, समीर मोटर ड्रायव्हिंग स्कूल तसेच प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) यांचा सहभाग होता.

यावेळी वाहनचालकांना सुरक्षित वाहनचालना, वाहतूक नियमांचे पालन, वेगावर नियंत्रण, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे तसेच रस्त्यावरील इतर वाहनचालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

वाहनचालक हे वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचे घटक असून, त्यांच्या जबाबदार आणि शिस्तबद्ध वाहनचालनेमुळे रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यास मोठी मदत होऊ शकते, असा संदेश यावेळी देण्यात आला.

“सुरक्षित चालक – सुरक्षित प्रवास – सुरक्षित समाज” हा संदेश देत ड्रायव्हर डे निमित्त वाहनचालकांचा सन्मान करण्यात आला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!