spot_img
spot_img
spot_img

बौद्धनगरमध्ये लोखंडी हातोडीने जीवघेणा हल्ला! एकाला अटक

शबनम न्यूज | प्रतिनिधी

सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून तिघांनी संगनमत करून एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना बौद्धनगर झोपडपट्टी परिसरात घडली. आरोपींनी आधी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर लोखंडी हातोडीने डोक्यासह तोंड, छाती आणि बरगडीवर वार करून गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. या गुन्ह्यात दोन महिला आरोपींचाही सहभाग असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या भावाच्या चारित्र्यावर संशय घेतल्याच्या कारणावरून संबंधित कुटुंबांमध्ये गेल्या सुमारे सहा महिन्यांपासून वाद सुरू होता. याच वादातून आरोपींनी एकत्र येत फिर्यादीच्या भावाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.

वादाचे रूपांतर काही क्षणांतच हिंसक हल्ल्यात झाले. एका आरोपीने लोखंडी हातोडी हातात घेत डोक्यावर, तोंडावर, छातीवर आणि बरगडीवर वार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या हल्ल्यात संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली.

जीवे मारण्याच्या उद्देशानेच हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केली आहे. उर्वरित आरोपींच्या भूमिकेबाबत तपास सुरू आहे.

पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!