शबनम न्यूज | प्रतिनिधी
घराचे लॉक तोडून घरात प्रवेश करत बॅगमध्ये ठेवलेली ५० हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना आळंदी-चाकण रोडवरील हनुमानवाडी परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अज्ञात चोरट्याविरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी राजेंद्र खाशाबा पिसाळ (वय ५४, रा. चिंचवड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपीने पिसाळ यांच्या घराचे लॉक तोडले.
त्यानंतर घरात प्रवेश करून बॅगमध्ये ठेवलेली ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. चोरीची घटना लक्षात आल्यानंतर पिसाळ यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा माग काढण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.




Total Users : 223445