शबनम न्यूज | प्रतिनिधी
भरधाव वेगाने वाहन चालवत दुचाकीला धडक दिल्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या व्यक्तीलाही जोरदार धडक देण्यात आली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या महादेव शिवपुत्र गवाडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळील वाल्हेकरवाडी परिसरात १४ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.
या प्रकरणी गणेश राजेंद्र तनपुरे (वय ४८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिंचवड पोलीस ठाण्यात दिनेश अशोक धोरे (वय ३४, रा. वडगाव मावळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वाहन भरधाव वेगाने चालवत होता. वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुचाकीला तसेच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या व्यक्तीला धडक बसली.
या अपघातात महादेव गवाडे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.




Total Users : 223445