spot_img
spot_img
spot_img

मोरवाडी चौकात भरधाव कारचा धुमाकूळ ; दुचाकीला पाठीमागून धडक

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मोरवाडी चौकातून नेपाळी मार्केटच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीला भरधाव कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली. त्यानंतर कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षालाही धडक देत तिचे नुकसान केल्याचा आरोप आहे. या अपघातात दुचाकीवरील महिलेच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली.

या प्रकरणी श्रद्धा किशोर देशमुख (वय २९, रा. तळवडे, निगडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंपरी पोलीस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आपल्या दुचाकीवरून मोरवाडी चौकातून नेपाळी मार्केटकडे जात होत्या. त्यावेळी मागून आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. कारला साईड देण्याचा प्रयत्न करत असतानाही पुन्हा धडक देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

यानंतर कारने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या रिक्षालाही धडक दिली. या धडकेत फिर्यादीच्या बहिणीच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली, तर दुचाकी आणि रिक्षाचे नुकसान झाले. या घटनेप्रकरणी पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!