शबनम न्यूज | प्रतिनिधी
वाहतूक कंपनीच्या कार्यालयाबाहेर पार्क केलेले दोन ट्रक अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना चाकण परिसरात घडली. रात्रीच्या सुमारास झालेल्या या चोरीमुळे वाहतूक व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, चोरीला गेलेल्या दोन्ही वाहनांची किंमत सुमारे ६० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी जितेंद्र मास्ती आगरकर (वय ५४) यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कंपनीच्या कार्यालयासमोर टाटा ९०९ आणि टाटा १२१२ हे दोन ट्रक पार्क करण्यात आले होते. रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने दोन्ही वाहने चोरून नेली. सकाळी वाहने जागेवर नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला.
या घटनेनंतर चाकण उत्तर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच उपलब्ध माहितीच्या आधारे पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.




Total Users : 223446