शबनम न्यूज | प्रतिनिधी
बेकायदेशीररीत्या धारदार तलवार बाळगणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला चाकण उत्तर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई चिचोशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमागील परिसरात करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश नवनाथ लोखंडे (वय १९, रा. चिचोशी, ता. खेड) याच्याकडे धारदार लोखंडी तलवार आढळून आली. पोलिसांनी तलवार ताब्यात घेत तरुणाला अटक केली.
शहर पोलीस आयुक्तांनी शस्त्रे तसेच धारदार हत्यारे बाळगण्यास मनाई करणारा आदेश जारी केला आहे. हा आदेश लागू असतानाही तलवार बाळगल्याने आरोपीने मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात अवैधरीत्या शस्त्रे बाळगणाऱ्यांवर पोलिसांची नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.




Total Users : 226134