spot_img
spot_img
spot_img

हिंजवडीत बेकायदेशीर पिस्तूल अन् जिवंत काडतूस जप्त

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पोलिसांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीररीत्या गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या २६ वर्षीय तरुणाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शिवारेवस्ती, मुळशी परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर करण्यात आली.

कुणाल चंद्रसेन गायकवाड (वय २६, रा. अजंठानगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या नोंदीनुसार, शिवारेवस्ती परिसरात कुणाल गायकवाड हा संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत राऊंड आढळून आला.

पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतूस तात्काळ जप्त करून तरुणाला ताब्यात घेतले. मनाई आदेश असतानाही शस्त्र बाळगल्याने त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या शस्त्राचा वापर कोणत्या कारणासाठी केला जाणार होता, तसेच त्याच्याकडे हे शस्त्र कोठून आले, याचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!