8.780 ग्रॅम एमडीसह 5.52 लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघांविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा
शबनम न्यूज | प्रतिनिधी
शहरात अंमली पदार्थांची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या संशयितांवर संत तुकारामनगर पोलिसांनी कारवाई करत 8.780 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जसह तब्बल 5 लाख 52 हजार 340 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे शहरातील एमडी ड्रग्जच्या तस्करीचे जाळे उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडे एमडी ड्रग्ज आढळून आले. अंमली पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने ते बाळगल्याचा संशय पोलिसांना आहे. कारवाईनंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला.
दरम्यान, तपासादरम्यान ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या आणखी एका व्यक्तीचे नाव पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणामागे आणखी मोठे ड्रग्ज रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
या प्रकरणी तानाजी कनुरे, मयूर पडले आणि एका महिला आरोपीविरोधात संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना ड्रग्जचा पुरवठा कुठून झाला, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे आणि शहरात हे ड्रग्ज कोणाला विक्री केले जाणार होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
एमडी ड्रग्जच्या तस्करीविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.










Total Users : 222756