शबनम न्यूज | प्रतिनिधी
घरासमोर सुरक्षितपणे लॉक करून पार्क केलेली तब्बल १० लाख रुपये किमतीची क्रेटा कार अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना ताथवडे परिसरात घडली. सकाळी कार जागेवर नसल्याचे लक्षात आल्यानंतर वाहन चोरीला गेल्याचे उघड झाले.
याप्रकरणी प्रतीक शंकर भोसले यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, भोसले यांनी त्यांची काळ्या रंगाची क्रेटा कार रात्री घरासमोर पार्क करून लॉक केली होती. त्यानंतर ते घरात गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर आल्यानंतर कार पार्क केलेल्या ठिकाणी दिसून आली नाही.
परिसरात शोध घेतल्यानंतरही कारचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास कार पळवून नेल्याचे स्पष्ट झाले. चोरीला गेलेल्या कारची किंमत सुमारे १० लाख रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी काळेवाडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह चोरीला गेलेल्या वाहनाचा शोध सुरू केला आहे. रहिवासी भागातून घरासमोर पार्क केलेली महागडी कार चोरीला गेल्याने ताथवडे परिसरातील वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.










Total Users : 222780