spot_img
spot_img
spot_img

शेलारवाडी फाट्यावर भरधाव कारचा कहर!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर शेलारवाडी फाटा परिसरात भरधाव कारने ॲक्टिव्हाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची भीषण घटना घडली. या अपघातात ॲक्टिव्हावरील 65 वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर आणखी एक व्यक्ती जखमी झाली. या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी कारचालक रजत सोळंकी याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन बोडके यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांचे वडील नामदेव बोडके (वय 65) हे ॲक्टिव्हावरून पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरून जात होते. ते शेलारवाडी फाटा परिसरात आले असताना आरोपी रजत सोळंकी याने कार भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवत ॲक्टिव्हाला पाठीमागून जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की, नामदेव बोडके गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात आणखी एक व्यक्ती जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. भरधाव आणि निष्काळजी वाहनचालकांमुळे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर अपघातांचा धोका वाढत असल्याचे या घटनेने पुन्हा अधोरेखित झाले आहे.

या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी कारचालक रजत सोळंकी याला अटक केली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!