spot_img
spot_img
spot_img

‘आज जिवंत सोडत नाही!’ म्हणत धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला; दापोडीत थरार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

फोनवर बोलत असलेल्या व्यक्तीवर अचानक धारदार शस्त्राने हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना दापोडी परिसरात घडली. या प्रकरणी दापोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हॉटेल संजना चायनीजसमोर, सीएमई गेट परिसरात हा प्रकार घडला. फिर्यादी विलास बबन हजारे फोनवर बोलत असताना विजय शिंदे आरोपीने अचानक त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपीने पुन्हा हल्ला करत ‘आज तुला जिवंत सोडत नाही’ अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.

मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीलाही आरोपीने धक्काबुक्की केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दापोडी पोलीस करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!