शबनम न्यूज | प्रतिनिधी
पैशांच्या वादातून मध्यरात्री तरुणावर पिस्तुलातून गोळी झाडल्याची खळबळजनक घटना चिखलीतील जाधववाडी परिसरात घडली. या प्रकरणी चिखली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी स्वप्नील जाधव, रोशन पिंगळे हे दोघे कारमधून घटनास्थळी आले. पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट हल्ल्यात झाले. आरोपीने पिस्तूल काढून फिर्यादी रवी धनाजी घोगरे यांच्या दिशेने गोळीबार केल्याचा आरोप आहे. या घटनेत फिर्यादी जखमी झाला.
घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न व शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




Total Users : 226215