मुलीच्या गळ्यातील ७० हजारांची सोनसाखळी गर्दीतून हिसकावली; वाकड पोलिसांत गुन्हा
शबनम न्यूज | प्रतिनिधी
गणपती उत्सवाच्या खरेदीसाठी कुटुंबासह बाहेर पडलेल्या महिलेला चोरट्याने लक्ष्य केले. गर्दीचा फायदा घेत तिच्या मुलीच्या गळ्यातील सुमारे ७० हजार रुपये किमतीची सोनसाखळी जबरदस्तीने काढून घेत चोरटा पसार झाला. ही घटना काळेवाडी फाटा परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या कुटुंबीय आणि मुलीसह गणपतीची मूर्ती खरेदी करण्यासाठी काळेवाडी फाटा परिसरात गेल्या होत्या. गणपती खरेदीसाठी परिसरात मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत गोरख दशरथ सुखाले याने महिलेच्या मुलीच्या गळ्यातील सोनसाखळीवर डल्ला मारला.
चोरट्याने गर्दीत मुलीच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने काढून घेतली आणि क्षणात तेथून पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला.
या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा माग काढण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.










Total Users : 222765