आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते शुभारंभ; राजकीय, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
रावेत / प्रतिनिधी / शिंदेवस्ती, रावेत येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या *‘कॅफे अरोमा’*चा उद्घाटन सोहळा चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात आणि दिमाखात पार पडला. या उद्घाटन सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, बांधकाम व्यावसायिक, पत्रकार तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रावेत परिसराचा झपाट्याने होत असलेला विकास आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता नागरिकांना दर्जेदार खाद्यपदार्थ, उत्तम सेवा तसेच कुटुंबीय व मित्रमंडळींसोबत आनंददायी वेळ घालविण्यासाठी एक चांगले ठिकाण उपलब्ध झाले आहे. या पार्श्वभूमीवर *‘कॅफे अरोमा’*च्या माध्यमातून ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी कॅफे अरोमाच्या संचालकांना शुभेच्छा देत व्यवसायाच्या यशस्वी वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
या प्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, माजी महापौर तथा नगरसेविका अपर्णा डोके, ज्येष्ठ नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, शेखर चिंचवडे, आशाताई सूर्यवंशी, ऐश्वर्या तरस, रश्मी कातळे, पल्लवी वाल्हेकर, धम्मपाल तंतरपाळे, तसेच माजी नगरसेवक सचिन चिंचवडे, राजेंद्र गावडे, मोरेश्वर भोंडवे, राजेंद्र साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच सामाजिक कार्यकर्ते बापू कातळे, चिंचवड व्यापारी संघटनेचे प्रमुख राजू चिंचवडे, बांधकाम व्यावसायिक श्रीकांत भोंडवे, महापालिका सेवानिवृत्त अधिकारी पी. बी. गायकवाड, उद्योगपती सुमित वाढोवकर, सुशील वाढोवकर, अमोल भोंडवे यांचीही उपस्थिती होती.
पत्रकारिता क्षेत्रातील ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे, पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षा सायली कुलकर्णी, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील उर्फ बाबू कांबळे, रेहान सय्यद, संतोष जराड, गणेश शिंदे, सोशल मीडिया अध्यक्ष सूरज साळवी, पत्रकार देवा भालके, दिलीप देहाडे, जितेंद्र गवळी,शबनम सय्यद, अमोल डंबाळे, सोमनाथ काळे, भीमराव बरकडे आदी उपस्थित होते.
याशिवाय राजलक्ष्मी ग्रीन्स सोसायटीचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने उद्घाटन सोहळ्याला विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. रावेत परिसरातील नागरिकांच्या पसंतीस ‘कॅफे अरोमा’ उतरावे आणि व्यवसायाची यशस्वी वाटचाल व्हावी, अशा शुभेच्छा यावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या.




Total Users : 238576