शबनम न्यूज | प्रतिनिधी
प्रख्यात मराठी सुगम संगीत गायिका अनुराधा मराठे यांचा ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पुणे फेस्टिव्हल तर्फे विशेष सत्कार मंगळवार दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, शाल, साडी व श्रीफळ असे सन्मानाचे स्वरूप आहे. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते सत्कार संपन्न होईल. या कार्यक्रमात अनुराधा मराठे यांच्या संगीत जीवनावर आधारित त्यांची प्रकट मुलाखत घेतली जाणार असून ज्येष्ठ निवेदिका मंजिरी धामणकर ही विशेष मुलाखत घेतील.










Total Users : 222948