spot_img
spot_img
spot_img

पोलिसांनी पकडलेल्या वाहनावर आमदाराचा लोगो; चालकाकडे परवानगी नाही

शबनम न्यूज | प्रतिनिधी

कोणतीही परवानगी नसताना वाहनाच्या पुढील काचेवर आर्थिक फायद्यासाठी आमदाराचे नाव व लोगो लावल्याचा प्रकार भोसरी हद्दीत समोर आला आहे. वाहतूक विभागातील पोलिस शिपाई संतोष राजाराम निचित यांनी तक्रार दिली आहे. १३ सप्टेंबर रोजी दुपारी हॉटेल शौर्यवाडा परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी वसीम अहमद अब्दुल जतील (वय ४२, रा. हडपसर), हितेंद्र अशोक कवडे (रा.घोरपडी) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार वाहनाच्या पुढील काचेवर महाराष्ट्र विधानसभा सदस्य, आमदार असा मजकूर असलेला छापील लोगो लावण्यात आला होता. वाहनचालकाकडे तो लोगो लावण्यासाठी कोणतेही अधिकृत कागदपत्र नसल्याचे पोलिसांना आढळले. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!