शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत महिला व इतर व्यक्तींकडून पैसे घेत १ लाख १४ हजार ११२ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
तारामती सोनबा मामणगर यांनी भोसरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार प्रतिक राजेश धाईजे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ऑनलाइन तसेच रोख स्वरूपात पैसे घेतले.
३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरदरम्यान हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.










Total Users : 222765