शबनम न्यूज | प्रतिनिधी
३८ व्या पुणे फेस्टिव्हलच्या ‘श्रींची’ प्रतिष्ठापना आज सोमवार, दि. १४ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता हॉटेल सारस, नेहरू स्टेडियम, पुणे येथे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चे आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी आणि त्यांच्या पत्नी डॉ.अनुश्री चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाली. वेदमूर्ती पं. धनंजय घाटे गुरुजी यांनी याचे पौराहित्य केले. यानिमित्त हॉटेल सारस येथील हॉल सुशोभित करण्यात आला होता. येरवडा कारागृहातील कैद्यांनी तयार केलेली गणेश मूर्ती यावेळी आवर्जून प्रतिष्ठापने साठी आणण्यात आली होती. याप्रसंगी पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, अॅड. अभय छाजेड, डॉ. सतीश देसाई, रमेश बागवे, सुनील शिंदे, अबेदा इनामदार, आय. पी. इनामदार, काका धर्मावत, राजू साठे, अतुल गोंजारी, द.स.पोळेकर, बाळासाहेब अमराळे, सुप्रिया ताम्हाणे, अॅड. अनुराधा भारती, अशोक मेमजादे, डॉ. रवी चौधरी, कर्ना उपाध्याय, आबा जगताप, संयोगिता कुदळे, तेजश्री अडिगे, नावेद अत्तार तसेच विनोद सुर्वे, नामदेव चाळके, सचिन खवले, विजय शेटे आणि एन. आय. ई. एम. चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










Total Users : 222831