spot_img
spot_img
spot_img

चिंचवड गणपती विसर्जन घाटाची पाहणी; स्वच्छता, प्रकाशव्यवस्था आणि सुरक्षेला प्राधान्य

शबनम न्यूज | प्रतिनिधी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिंचवड येथील गणपती विसर्जन घाटाची महापौर रवी लांडगे, आमदार उमाताई खापरे, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, ‘ब’ प्रभाग अध्यक्ष मंदार देशपांडे, नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर तसेच महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

गणेश विसर्जनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन घाट परिसरातील स्वच्छता, प्रकाशव्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, पिण्याचे पाणी, वाहतूक नियोजन आणि इतर आवश्यक सुविधांचा आढावा यावेळी घेण्यात आला. भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, तसेच विसर्जन प्रक्रिया सुरक्षित आणि सुरळीत पार पडावी, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

घाट परिसरात स्वच्छता नियमित ठेवण्याबरोबरच रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाशव्यवस्था उपलब्ध करून देणे, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे आणि गर्दीच्या वेळी प्रशासनाच्या विविध विभागांमध्ये समन्वय ठेवणे यावरही यावेळी भर देण्यात आला.

गणेशभक्तांना विसर्जनाच्या वेळी सुरक्षित आणि सुविधायुक्त वातावरण मिळावे, यासाठी महापालिका प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, अशा सूचना नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!