spot_img
spot_img
spot_img

जुन्नरच्या रणरागिणी आशाताई बुचके यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय क्षेत्राची मोठी हानी : आमदार महेश लांडगे

पिंपरी चिंचवड : जुन्नर तालुक्यातील कणखर, संघर्षशील आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या आशाताई बुचके यांच्या निधनाने सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत आमदार महेश लांडगे यांनी श्रद्धांजली व्यक्त केली.

आशाताई बुचके यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी असल्याचे आमदार लांडगे यांनी म्हटले. त्यांच्या निधनाने जुन्नर तालुक्याच्या सार्वजनिक जीवनातील एक रणरागिणी, संवेदनशील नेत्या आणि आशादायी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

आशाताई बुचके यांनी आपल्या सामाजिक व राजकीय वाटचालीत सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ कायम जपली. गोरगरीब, कष्टकरी, वंचित आणि गरजू नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला. अन्यायाविरोधात ठाम भूमिका घेत जनतेच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची त्यांची जिद्द ही त्यांच्या कार्याची विशेष ओळख होती.

जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे आणि सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व म्हणून आशाताई बुचके यांचे कार्य कायम स्मरणात राहील. सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेकांना त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांना बळ देण्यासोबतच सामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची त्यांची संवेदनशीलता प्रेरणादायी होती.

आशाताई बुचके यांच्या निधनाने जुन्नर तालुक्याच्या सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी जपलेली जनसेवेची भावना, संघर्षाची भूमिका आणि सर्वसामान्यांसाठी काम करण्याची तळमळ पुढील पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी राहील.

आशाताई बुचके यांच्या सामाजिक व राजकीय कार्याला विनम्र अभिवादन करून आमदार महेश लांडगे यांनी त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना, आप्तेष्टांना, सहकाऱ्यांना आणि असंख्य समर्थकांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना त्यांनी केली.

ॐ शांती!

आशाताई बुचके यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!