spot_img
spot_img
spot_img

सखी अंगण आकुर्डी येथील बचत गटांच्या गाळे वाटपात अनियमिततेचा आरोप; ई-टेंडरिंग प्रक्रिया पुन्हा राबविण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड : समाज विकास विभागांतर्गत बचत गटांना देण्यात आलेल्या गाळे वाटप प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे युवक अध्यक्ष विकी रोहिदास पासोटे व सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ जावीर यांनी केला आहे.

कागदपत्रांच्या तपासणीत काही बचत गटांच्या नावावर एकापेक्षा अधिक गाळे, नोंदणी तारखांमधील विसंगती तसेच भाडे व अनामत रकमेसंदर्भात प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे.

या प्रकरणाचा पाठपुरावा करून हा प्रकार समोर आणल्याचा दावा विकी पासोटे व आदिनाथ जावीर यांनी केला असून, समाज विकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ई-टेंडरिंग प्रक्रिया रद्द करून नव्याने पारदर्शक पद्धतीने राबवावी, संपूर्ण गाळे वाटपाची Cross Verification करावी आणि चौकशीत दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी, कर्मचारी किंवा व्यक्तींवर कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!