spot_img
spot_img
spot_img

आमदार उमा खापरे यांची विशेष समितीवर सदस्य म्हणून निवड!

महिलांच्या प्रश्नांसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत समावेश; डॉ. नीलम गोऱ्हे अध्यक्ष

मुंबई, दि. ९ : महिलांशी संबंधित विविध प्रश्नांचा अभ्यास करून त्यावर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष समितीवर विधानपरिषद सदस्य उमा खापरे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी विधानपरिषद सदस्य डॉ. (श्रीमती) नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या समितीत विधानपरिषदेतील डॉ. (श्रीमती) प्रज्ञा सातव, श्रीमती भावना गवळी, श्रीमती चित्रा वाघ, उमा खापरे आणि डॉ. मनिषा कायंदे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. तसेच विधानसभा सदस्य श्रीमती स्नेहा-दुबे पंडित आणि श्रीमती श्वेता महाले यांचीही सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

महिलांशी संबंधित विविध प्रश्न, समस्या तसेच त्यावरील उपाययोजनांचा अभ्यास करण्यासाठी ही समिती काम करणार आहे. महिलांच्या प्रश्नांना विधिमंडळाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्यासोबतच संबंधित विषयांवर आवश्यक कार्यवाही करण्याच्या दृष्टीने समितीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

उमा खापरे यांच्या निवडीमुळे पिंपरी-चिंचवडसह राज्यातील महिलांच्या विविध प्रश्नांना समितीच्या माध्यमातून प्रभावीपणे वाचा फोडण्याची संधी मिळणार आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!