पिंपरी : दिल्ली येथे नुकतेच पार पडलेल्या इंडिया फ्लोरिस्ट असोसिएशनच्या (IFA) ८ व्या राष्ट्रीय अधिवेशनात पिंपरी-चिंचवडने आपला ठसा उमटवला.
देशातील २४ राज्यांतील १०५ शहरांमधून २६३ दिग्गज फूल व्यावसायिक या अधिवेशनासाठी आले होते. त्यापैकी महाराष्ट्रातून ९५ सभासद गेले, आणि एकट्या,मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातून ४५ जणांचा मोठा सहभाग होता.
या अधिवेशनात आपल्या पिंपरी-चिंचवडच्या व्यावसायिकांनी घवघवीत यश मिळवले
चिंचवड स्टेशन येथील स्नेह फ्लोरिस्ट चे संचालक पंढरीनाथ म्हसके यांची
महाराष्ट्र प्रमुखपदी नियुक्ती आणि मानाचा ‘फ्लोरिस्ट्री ॲम्बेसेडर / पुष्परचना दूत’ पुरस्कार – IFA चे उपाध्यक्ष श्रीकांत कनोई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
केशव त्रिभुवन (ओम फ्लॉवर्स, पिंपरी) यांची
IFA च्या प्रशिक्षकपदी (Trainer) नियुक्ती आणि
‘रायझिंग स्टार ऑफ IFA / IFA चा उदयोन्मुख तारा’ हा पुरस्कार- गोपाल सैनी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
याशिवाय पिंपरीतील मयुरेश्वर पुष्प भांडार चे मालक श्याम मांडगे, सांभाजी नगर येथील प्रमाणित फ्लोरिस्ट फुलोरा चे संचालक अविनाश लोखंडे आणि प्राधिकरण येथील नक्षत्र फ्लॉवर चे मालक नारायण चौधरी यांचाही विशेष गौरव करण्यात आला.त्यामुळे पिंपरी चिंचवड मधील पुष्प व्यावसायिकात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण आहे. भविष्यात जास्तीतजास्त फुले विक्रेत्यांना व फुलांचे उत्पादन करणार्या शेतकर्यांना यात सहभागी करून घेण्यात येणार आहे असे शाम मांडगे यांनी सांगितले.
या राष्ट्रीय अधिवेशनात व्यवसायवृद्धीसाठी उपयुक्त सेशन्स घेण्यात आले आणि प्रथमच IFA वार्षिक पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या दुहेरी यशामुळे पिंपरी-चिंचवडच्या फूल व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून संपूर्ण शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
पिंपरी-चिंचवडकरांसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब!










Total Users : 221410