spot_img
spot_img
spot_img

दहीहंडी पाहून घरी परतणाऱ्या १४ वर्षीय मुलावर हल्ला; स्टीलच्या कड्याने डोक्यात मारहाण

काळेवाडी | प्रतिनिधी : युनूस खतीब

दहीहंडीचा कार्यक्रम पाहून मित्रासोबत घरी परतणाऱ्या १४ वर्षीय मुलाला तिघांनी अडवून मारहाण केल्याची घटना काळेवाडीतील अयोध्या कॉलनी परिसरात घडली. या हल्ल्यात मुलाच्या डोक्याला दुखापत झाली आहे.

याप्रकरणी अल्पवयीन मुलाने काळेवाडी पोलिसांत तक्रार दिली असून अंकुश गौतम (वय १९) व त्याचे दोन अनोळखी साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास मुलगा दहीहंडी व डीजेचा कार्यक्रम पाहून मोबाईल घेऊन घरी जात होता. अयोध्या कॉलनी येथे आरोपींनी त्याला पकडले. त्यानंतर अंकुश गौतम याने हातातील स्टीलच्या कड्याने मुलाच्या डोक्यात मारहाण करून जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

काळेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!