निगडी | प्रतिनिधी : युनूस खतीब
रावेत-निगडी मार्गावर वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून विरुद्ध दिशेने आलेल्या ट्रकने दुचाकीला समोरून धडक दिल्याची घटना ट्रान्सपोर्टनगर परिसरात घडली. अपघातात दुचाकीस्वार महिला जखमी झाली असून, ट्रक चालक अपघातस्थळी न थांबता फरार झाला.
दि. ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास एमएच १४ जीयू २०८१ क्रमांकाच्या ट्रकने एमएच १४ एमपी ३९३० क्रमांकाच्या ज्युपिटर दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीचे नुकसान झाले असून महिला फिर्यादीला किरकोळ तसेच गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर ट्रक चालकाने जखमी महिलेला मदत न करता घटनास्थळावरून पलायन केले. याप्रकरणी निगडी पोलिसांनी अनोळखी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.










Total Users : 220868