spot_img
spot_img
spot_img

निगडीत धारदार पालघन घेऊन फिरणाऱ्यावर पोलिसांची कारवाई; मनाई आदेशाचा भंग

निगडी | प्रतिनिधी : युनूस खतीब

निगडीतील ओटास्किम परिसरात धारदार लोखंडी पालघन बाळगून फिरणाऱ्या ५५ वर्षीय व्यक्तीवर निगडी पोलिसांनी कारवाई केली. पोलिस आयुक्तांच्या शस्त्रबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

आयुब अहमद पठाण (वय ५५, रा. ओटास्किम, निगडी) असे कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दि. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास स्मशानभूमीजवळील मोकळ्या मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तो धारदार लोखंडी पालघन बाळगलेल्या अवस्थेत आढळून आला.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत २ सप्टेंबर ते १५ सप्टेंबरदरम्यान शस्त्र बाळगण्यास मनाई असतानाही आदेशाचे उल्लंघन केल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!