पिंपरी | प्रतिनिधी : युनूस खतीब
पिंपरीतील डेअरी फार्म परिसरात एमडी पावडर विक्रीच्या उद्देशाने बाळगणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाला पिंपरी पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून ३४.२४ ग्रॅम एमडी पावडर, मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विशाल प्रकाश घोडके (वय ३२, रा. रहाटणी-काळेवाडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. दि. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास डेअरी फार्म रोडलगतच्या मोकळ्या जागेत तो संशयास्पदरीत्या आढळून आला.
झडतीमध्ये १ लाख ७१ हजार २०० रुपये किमतीची एमडी पावडर मिळून आली. तसेच सुमारे ८० हजार रुपये किमतीची टीव्हीएस रायडर मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली.
याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.










Total Users : 220869