spot_img
spot_img
spot_img

महाराष्ट्र-मध्यप्रदेशात घरफोड्या करणारा सराईत चोर जेरबंद; २४.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

शिरूर | प्रतिनिधी : युनूस खतीब

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात घरफोडीच्या तब्बल १४ गुन्ह्यांत सहभागी असलेल्या सराईत चोरट्याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातून अटक केली. आरोपीकडून सुमारे १६ तोळे सोन्याचे दागिने व मोटारसायकल असा एकूण २४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिपक भिमराव दांडगे (वय २५, रा. भैसदेही, जि. बैतूल, मध्यप्रदेश; सध्या रा. कविठा, ता. अचलपूर, जि. अमरावती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा आणि शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने त्याचा माग काढला.

चौकशीत आरोपीने शिक्रापूर पोलीस ठाण्यातील दोन आणि शिरूर पोलीस ठाण्यातील एका घरफोडीची कबुली दिली. या तीन गुन्ह्यांचा उलगडा झाला असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत. आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलिसांची संयुक्त कारवाई.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!