spot_img
spot_img
spot_img

थोर क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपआयुक्त आण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रशांत माकर,केतन चव्हाण,स्वप्नील जाधव,प्रतिक माकर,आशा तटले,कल्पना माकर तसेच महानगरपालिकेचे विविध विभागातील कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.

राजे उमाजी नाईक हे अन्याय, अत्याचार आणि जुलमी सत्तेविरुद्ध संघर्ष करणारे शूर क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात. त्यांनी स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांसाठी आयुष्यभर संघर्ष केला, अन्यायाविरुद्ध आवाज उठवून वंचित आणि शोषित घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेला लढा हा महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रेरणादायी अध्याय आहे. त्यांच्या धैर्य, शौर्य आणि त्यागाची आजही समाजाला प्रेरणा मिळते.
राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा आणि संघर्षाचा आदर्श पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. देशभक्ती बरोबरच सामाजिक समता, न्याय, स्वाभिमान आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांच्या कार्यातून मिळते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!