पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी हॉटेलसमोर वाहन अडवून कोयत्याचा धाक दाखवत तसेच दगडाने डोक्यात मारहाण करून लूट केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
दि. ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ही घटना घडली. आरोपींनी संतोष शेडगे यांचे स्विफ्ट वाहन अडवून त्यांच्याकडील एक हजार रुपये जबरदस्तीने घेतले. आणखी पैसे मागत आरोपी अरविंद कोळी याने कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली, तर शुभम कोळी याने शेडगे यांच्या डोक्यात दगड मारून दुखापत केली.
या प्रकरणी अरविंद अमरेष कोळी (२२) आणि शुभम हनुमंत कोळी (२५) यांना अटक करण्यात आली असून, तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करीत आहेत. आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचे विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










Total Users : 220526