पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
धानोरे येथील कांगारू पॉलीमर्स कंपनीत उंचीवर काम करताना सुरक्षा साधने न दिल्याने खाली पडून २३ वर्षीय मजुराचा मृत्यू झाला. या प्रकरणी आळंदी पोलिसांनी कंपनीशी संबंधित संदीप सिंगल आणि अलतमश खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दि. ४ सप्टेंबर रोजी अंकितकुमार वर्मा व शाहीद खान हे लोखंडी कैचीला वेल्डिंगचे काम करत असताना उंचीवरून खाली पडले. हेल्मेट, हार्नेस अथवा अन्य सुरक्षा उपाययोजना न केल्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या अंकितकुमार वर्मा याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. याप्रकरणी आळंदी पोलीस अधिक तपास करीत आहेत.










Total Users : 220526